तत्र सघनं वनम् आसीत् । स्थूलगुल्मैः, आम्रैः, फनाभिः, अनेकैः वृक्षैः गुल्मैः च सम्पूर्णतया आच्छादितम् आसीत् । एतावत् यत् दिवा अपि सूर्यकिरणाः वनस्य अन्तः न प्राप्नुवन् । अस्य कारणात् वने पशुपक्षिवन्यजन्तुनां व्याप्तिः बहुधा वर्धिता । (चल्ला रे भोपाले तुनुक तुनुक वृद्धा कथा)।
वनाद् अल्पदूरे मानवनिवासः आसीत् । वने व्याघ्रवृकाणां कारणात् तस्य बस्तीयाः जनाः प्राणान् हस्ते कृत्वा जीवन्ति स्म । तस्मिन् एव बस्तीयां वृद्धा महिला निवसति स्म । सा कन्यायाः विवाहात् आरभ्य एकाकी वसति स्म । सा स्वपुत्रीं बहु स्मरति स्म ।
वृद्धः अजबाई, एकस्मिन् दिने स्वस्य लेकीं गत्वा तां मिलितुं निश्चितवान्। परन्तु समस्या आसीत् यत् तस्याः लेक्की गृहं वनेभ्यः परम् आसीत् । लेक्की इत्यनेन सह मिलितुं तस्याः वनं गन्तव्यम् आसीत् ।
परन्तु वृद्धा शूरः आसीत् । सा स्वपुत्रीं मिलितुं निश्चयं कृत्वा भयभीतं वनं दिशि मिलितुं प्रस्थिता ।
सा वृद्धा वेगेन गच्छति स्म। मार्गे सा एकं वृकं मिलितवती।
सः अवदत्, “अरे! वृद्ध, अहं क्षुधार्तोऽस्मि, अहम् इदानीं त्वां खादिष्यामि।"
वृद्धा अतीव भीता आसीत् किन्तु सा तत् न दर्शितवती। सा अवदत्, “किं मम भोजनम् अस्ति ? केवलं अस्थिः एव ! अहं लेक्कीं गमिष्यामि। अहं चतुर्दिनानि यावत् तिष्ठामि। अहं घृतं रोतिं खादिष्यामि। अहं स्थूलम् आगमिष्यामि। तदा त्वं मां खादसि” इति ।
वृकः अवदत् त्वं सत्यः, परन्तु शीघ्रम् आगच्छतु। अहं प्रतीक्षिष्यामि” इति ।
सा वृद्धा अवदत्- "अतिसत्यम्!" वृकाः तां त्यक्तवन्तः।
सा वृद्धा अग्रे अगच्छत्। ततः सा एकं व्याघ्रं मिलितवती।
उवाच "वृद्धः, इदानीं त्वां खादामः।" "वृद्धा अवदत्- "वाघोबा, मम भोजनम् अस्ति वा ?
केवलं अस्थिः एव ! अहं लेक्कीं गमिष्यामि। अहं चतुर्दिनानि यावत् तिष्ठामि। अहं घृतं रोटिकां च खादिष्यामि। अहं स्थूलम् आगमिष्यामि। ततः मां भक्षयतु” इति ।
“अच्छा, साधु” इति व्याघ्रः अवदत् । परन्तु शीघ्रमेव आगच्छतु!"
सा वृद्धा अवदत्- "अतिसत्यम्!" व्याघ्रः तां त्यक्तवान् ।
वृद्धा लेक्कीं गता। कतिपयदिनानि यावत् स्थितवान्। घृतरोतिं खादित्वा सः स्थूलः अभवत् । अथ लेकिम् उक्तवान्।
“बालिकाः, अधुना अहं गृहं गच्छामि ग” लेकः अवदत्, “अम्ब, चत्वारि दिवसानि अपि तिष्ठतु।
सा वृद्धा अवदत्, “न भद्रे।
वने वृकः मां प्रतीक्षते।
व्याघ्रः मां प्रतीक्षते। बालिका मातुः चिन्ताम् अवगच्छत्। सा अवदत्, .
“अम्ब, एतत् महत् कदलीफलं गृहाण। तस्मिन् उपविशतु। अतः त्वां कोऽपि न पश्यति।" त्वं च सुरक्षिततया गृहं प्राप्स्यसि। वृद्धा कदले उपविश्य अवदत्, "आगच्छ कदली, शनैः शनैः।"
कद्दूकः पलायितः। वने एकः व्याघ्रः मिलितवान् । सः आह-कदली, कदली, वृद्धां दृष्टवती वा? वृद्धा कदलीफलात् अवदत्, “न जानामि वृद्धा। कदलीफलं गच्छामः, शनैः शनैः” इति कद्दूकः पलायितः ।
व्याघ्रः शङ्कितः अभवत् । सः अपि कदलीफलस्य पश्चात् धावितवान् । मार्गे एकः वृकः मिलितवान्। सः कदलीफलं अवरुद्धवान्। वृद्धा महिला बहिः निष्कासिता। ततोऽब्रवीत्- वृद्ध, किं मां वञ्चयसि ? इदानीं त्वां भक्षयिष्यामि” इति ।
तावत् व्याघ्रः अपि तत्र आगतः। सः अवदत्, अहं वृद्धां खादिष्यामि। “अहं खादिष्यामि” इति वृकः अवदत् । अहं खादिष्यामि इति व्याघ्रः अवदत् । तौ कलहं कृतवन्तौ। तत् दृष्ट्वा वृद्धा गुप्तरूपेण कदले उपविश्य अवदत्, "कद्दू, तुनुक्। व्याघ्रः वृकः च युद्धं कृत्वा वृद्धायाः प्राणाः रक्षिताः। (चल रे भोपल्या तुनुक् तुनुक कथा मराठी)।
संक्षेपेण कदलीफलं गच्छामः : १.
व्याघ्रं वृकं च सहितुं न शक्ष्यति इति वृद्धा अवगतवती आसीत् । संकटे अपि अजीबाई अद्भुतं युक्तिं कल्पितवान् । युक्तिः असफलः अभवत् अपि यदा व्याघ्रः वृकः च युद्धं आरब्धवन्तौ तदा सा वृद्धा प्लवमाना तस्याः प्राणान् रक्षितवती ।
चल रे भोपाल तुनुक तुनुक तुनुक अर्थ: १.
निहितार्थः १ : रणनीतिः पराक्रमात् श्रेष्ठा भवति।
तात्पर्यम् २: शत्रुः बलवान् अपि चतुरः भूत्वा संकटकाले स्वप्राणान् रक्षितुं शक्नोति।
=====================================
एका घनदाट जंगल होते. गर्द झाडी, आंबा, फणस आणि अनेक प्रकारच्या झाडा- झुडपांनी ते जंगल पूर्णपणे आच्छादले गेले होते. इतके की अगदी दिवसाही सूर्याची किरणे जंगलाच्या आतमध्ये पोहचणे शक्य होत नसे. त्यामुळे पशु-पक्षी आणि हिंस्त्र प्राण्यांचा वावर जंगलात मोठ्या प्रमाणात वाढला होता. (चल रे भोपळ्या टुणुक टुणुक म्हातारीची गोष्ट).
जंगलाच्या थोड्याच अंतरावर माणसांची वस्ती होती. जंगलातील वाघ, लांडग्यांमुळे त्या वस्तीतील माणसं जीव मुठीत घेऊन जगत असत. त्याच वस्तीत एक म्हातारी राहत होती. तिच्या मुलीचं लग्न झाल्यापासून ती एकटीच राहत होती. तीला आपल्या मुलीची खूप आठवण यायची.
म्हाताऱ्या अजीबाईने, एक दिवस आपल्या लेकीकडे जाऊन तिला भेटायाचं ठरविले. पण अडचण ही होती की तीच्या लेकीचं घर होतं जंगलांच्या पलीकडे. लेकीला भेटण्यासाठी तिला जंगलाच्या वाटेने जावं लागत असे.
पण म्हातारी धीट होती. तिने आपल्या लेकीला भेटायचा निश्चय केला आणि न घाबरता ती भयानक जंगलाच्या दिशेने लेकीला भेटायला निघाली.
झप झप पावलं टाकत म्हातारी चालत होती. वाटेत तिला भेटला एक लांडगा.
तो म्हणाला, “ऐ! म्हातारे, भूक लागली मला, मी खातो आता तुला."
म्हातारी मनातून खूप घाबरली पण तिने तसे दाखवले नाही. ती म्हणाली, “माझ्यात खायला आहेच काय? नुसती हाडे! लेकीकडे जाईन. चार दिवस राहीन. तूप रोटी खाईन. जाडजूड होऊन येईन. मग तू मला खा.”
लांडगा म्हणाला, तू बोलत तर खरं आहेस, पण लवकर ये हं. मी वाट पाहीन.”
म्हातारी म्हणाली, "अगदी खरं!" लांडग्यांने तीला जाऊ दिलं.
म्हातारी पुढे निघाली. मग तिला भेटला एक वाघ.
तो म्हणाला. “म्हातारे, खातो आता तुला. '' म्हातारी म्हणाली, “वाघोबा, माझ्यात खायला आहेच काय?
नुसती हाडे! लेकीकडे जाईन. चार दिवस राहीन. तूप-रोटी खाईन. जाडजूड होऊन येईन. मग मला खा.”
वाघ म्हणाला, “बरं, बरं. पण लवकर परत ये हो!"
म्हातारी म्हणाली, "अगदी खरं!" वाघाने तीला जाऊ दिलं.
म्हातारी लेकीकडे गेली. थोडे दिवस राहिली. तूप रोटी खाऊन जाडजूड झाली. मग लेकीला म्हणाली,
“मुली, आता मी घरी जाते ग." लेक म्हणाली, “आई, आणखी चार दिवस राहा ना.
" म्हातारी म्हणाली, “नको ग बाई.
जंगलात लांडगा माझी वाट बघतोय.
वाघ माझी वाट बघतोय. मुलीला आईची काळजी समजली. ती म्हणाली,
“आई, हा घे मोठ्ठा भोपळा. त्यात बसून जा. म्हणजे तुला कोणी बघणार नाही." आणि सुखरूप घरी पोहचशील म्हातारी भोपळ्यात बसली आणि म्हणाली, “चल रे भोपळ्या, टुणुक टुणुक.''
भोपळा पळत पळत निघाला. जंगलात भेटला वाघ. तो म्हणाला, “भोपळ्या, भोपळ्या, म्हातारीला पाहिलेस का रे?” भोपळ्यातून म्हातारी म्हणाली, “म्हातारीबितारी मला नाही ठाऊक. चल रे भोपळ्या, टुणुक टुणुक.'' भोपळा जोरात पळत सुटला.
वाघाला संशय आला. तोही भोपळ्याच्या मागे पळत सुटला. वाटेत भेटला लांडगा. त्याने भोपळ्याला अडवले. म्हातारीला बाहेर काढले. मग म्हणाला, “म्हातारे, मला फसवतेस काय? आता मी तुला खाणार.”
एवढ्यात वाघही तिथे आला. तो म्हणाला, मीच खाणार म्हातारीला. लांडगा म्हणाला, “मी खाणार. '' वाघ म्हणाला, मी खाणार. दोघांचे भांडण जुंपले. ते पाहून म्हातारी गुपचूप भोपळ्यात बसली आणि म्हणाली, " भोपळ्या, टुणटुणुक. वाघ आणि लांडगा भांडत बसले आणि म्हातारीचा जीव वाचला. (Chal Re Bhoplya Tunuk Tunuk Story Marathi).
चल रे भोपळ्या टुणुक टुणुक गोष्ट सारांश:
वाघ आणि लांडग्यापुढे आपला काय आता टिकाऊ लागणार नाही हे म्हातारीला कळून चुकले होते. संकटात असताना देखील आजीबाईला भन्नाट युक्ती सुचली. युक्ती फोल ठरूनदेखील वाघ आणि लांडग्याची जेव्हा लढाई सुरु झाली तेव्हा म्हातारीने धूम ठोकली आणि स्वतःचे प्राण वाचवले.
चल रे भोपळ्या टुणुक टुणुक तात्पर्य:
तात्पर्य १: शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ.
तात्पर्य २: शत्रू बलाढ्य असले तरीही हुशारीने स्वतःचा जीव संकटकाळी वाचवता येऊ शकतो.
No comments:
Post a Comment